Shashikala: The 85-Year Journey of a Loving Mother - Aile hikayeleri

Shashikala: The 85-Year Journey of a Loving Mother

Hikaye Açıklaması

This heartwarming story follows the life of Shashikala, from her mischievous childhood in a small village to becoming the matriarch of a large family in Nashik. Witness a beautiful journey of eighty-five years filled with love, resilience, and the strength of a woman who built a legacy of care.

Puanlar:Yeterli puan yok
Dil:İngilizce
Yayın Tarihi:
Okuma Süresi:1 dakika

Anahtar Kelimeler

Oluşturma İstemi

जय भीम मंडळी… तुमचे काही मिनिटे घेण्यासाठी मी पुन्हा एकदा येथे आलो आहे; तुमचा थोडा वेळ घेतल्याबद्दल मी क्षमस्व आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे... एका मुलीची गोष्ट... त्या इथे, आपल्यासोबत उपस्थित आहे. त्यांचा जन्म एका अतिशय लहान गावात झाला. त्या आई-वडिलांची एक प्रेमळ मुलगी व इतर चार भावंडांची एक अत्यंत प्रेमळ आणि गोड बहीण. त्या नेहमीच त्यांच्या आईसोबत शेतात जायच्या. ती थोडी हट्टी, आणि थोडी खोडकर होती. भाऊ, बहिणी आणि मैत्रिणीसोबत आट्यापाट्या, लिंगोरचा, पकडापकडी खेळणे, हे सर्व खेळ ती दिवसभर खेळायची. आंबे, चिंच, बोर तोडण्यासाठी झाडावर ती अगदी सहजपणे चढायची. जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा तिचे लग्न एका भारतीय सैनिकाशी झाले. तिच्या पतीचे कुटुंब खूप मोठे होते. तिने आपल्या सासू-सासऱ्यांसोबत हे मोठे कुटुंब सांभाळले. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तिच्या पतीला भारतीय प्रतिभूति मुद्राणालय नाशिक मध्ये नोकरी मिळाली. ती आपल्या संपूर्ण कुटुंब व पतीसोबत नाशिकला स्थलांतरित झाली. आणि त्यानंतर ते नाशिकमध्येच राहिले. काहींच्या त्या आई आहेत. काहींसाठी त्या 'मोठी आई' आहेत. काहींसाठी त्या आत्या, मामी, काकू आहेत. काहींसाठी त्या 'आई - आजी ' आहेत. काहींसाठी त्या 'पणजी आई' आहेत. काहींसाठी त्या 'प-आई' आहेत. तर, त्या दुसरं-तिसरं कोणी नसून आमच्या सर्वांच्या लाडक्या आजी श्रीमती शशिकला देवराम शिरसाठ आहेत. चार दिवसांपूर्वी, म्हणजेच... ९ मे २०२६ रोजी, आमच्या आजींनी आपली वयाची ८५ वर्षे पूर्ण केली आहेत तिने आपल्या मुलांची काळजी घेतली आणि त्यांना अत्यंत उत्तम वातावरणात वाढवले, सांभाळले व घडवले.. या आमच्या माऊलीने तिच्या मुलांच्या मुलांना, मला, माझ्या भावंडांना, आम्हा सर्व नातवंडांना न्हाऊ घातल , अंगा, खांद्यावर खेळवल, आमच पालनपोषण केल, आम्हा सर्व नातवंडांचा सांभाळ केला. आशा आमच्या या ८५ वर्षाच्या पारंपरिक आई-आजींचा वाढदिवस आपण पाश्चात्य पद्धतीने केक कटिंग करुण करणार आहोत …. मी श्री. सचिन साळवे आणि सौ. विद्या केदारे यांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या आजींना मंचावर घेऊन यावे. . . . धन्यवाद

Yorumlar

Yükleniyor...